न्यूज पीसीएमसी नेटवर्क
- नगरसेविका अश्विनी जाधव यांचा स्तुत्य उपक्रम.
चिखली (१६ नोव्हें) :- नगरसेविका अश्विनी जाधव व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्यावतीने भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (दि.१७ नोव्हें.) रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत चिखली-जाधववाडी येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात केअर न्यूरो हॉस्पिटल, अशियन आय हॉस्पिटल तसेच सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलचे नामांकीत तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवण्यासाठी ९८५०७२३६३६ या मोबाईल क्रमांकावर तसेच नगरसेविका आश्विनी जाधव यांचे जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी केले आहे.