न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पोलीस फेंन्डस् वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवड यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना पोलिसांकरीता वसाहतीसाठी भूखंड आरक्षित ठेवण्यात यावा, यासाठी निवेदन दिले आहे.
या निवेदनात पिंपरी-चिंचवड शहरामध्ये १५ ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर, मावळ, मुळशी, खेड तालुक्यांची हद्द नवीन पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली आहे. या आयुक्तालयात जवळपास हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या परिसरातील कायदा, सुव्यवस्था उत्तम रहावी यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात घरकुलसारखी योजना राबविली पाहिजे, असे नमूद केले आहे.