न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१६ नोव्हें) :- शहरातील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांच्या विरोधात अपना वतन संघटनेच्या वतीने राज्य सरकार व पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्याशी पत्रव्यवहार केलेला होता, परंतु त्यास प्रशासनाने कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे हाती घेतला आहे.
अपना वतन संघटनेच्या मागण्यांवर राज्य सरकार व पोलीस यंत्रणेने सकारत्मक भूमिका न घेतल्याने शनिवार (दि.१७) पासून संघटनेच्यावतीने उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. या उपोषण आंदोलनास शहरातील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे
देशहिताच्या व समाजहिताच्या आंदोलनास शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊन आमचे मनोबल अनेक पटींनी वाढवले आहे. असल्याचे अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.