न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १७ नोव्हें) :- मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच ‘आता आंदोलन करू नका, १ डिसेंबरला जल्लोष करा’ असे वक्तव्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याची भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली.
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यासांठी मुंबईत आझाद मैदानावर सकल मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज (शनिवार) १६ वा दिवस आहे. या आंदोलनकर्त्यांना भेटायला गेल्यानंतर विखे-पाटीलांनी माध्यमांसमोर बोलताना याबाबत सांगितले.










