न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १८ नोव्हें.) :- स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या माध्यमातून आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि. १८) रोजी चिखलीतील रामदासनगर येथील चंद्रभागा गोशाळामध्ये चारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कामगार नेते सचिन भैय्या लांडगे याच्या हस्ते चारा वाटप करण्यात आले. यावेळी मा. नगरसेवक कुदंन गायकवाड, संतोष मोरे, पांडुरंग भालेकर, रामकृष्ण लांडगे, सतोष लांडगे, अरूण लांडे, जितेंद्र मेहता, मनोज मोरे, विजयराज यादव, योगिराज ढमाले, दिपक घन, वैभव वाघ, किशोर लोंढे, विशाल उमाप, बाळासाहेब यादव, सचिन शहा, महेश आवटे, कोस्तुभ यादव, शुभम शिंदे आदी उपस्थित होते.
















