न्युज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १८ नोव्हें.) :- रहाटणीतील तापकिरनगर येथील हॉटेल राजरत्न परिसरात ड्रेनेजलाईन नादुरुस्त झाली असून, वेळोवेळी तुंबलेल्या अवस्थेत असल्यामुळे चेंबरमधील मैला रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिवसेनेच्यावतीने याची दखल घेत ग प्रभाग अधिकारी झगडे यांना ड्रेनेजलाईन दुरुस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रशासन अधिकारी यांनी लवकरात लवकर ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले असल्याचे युवराज दाखले यांनी सांगितले.
















