न्युज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी वार्ताहर (दि. १८ नोव्हें.) :- राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश, तालुका हवेली व तालुका खेड) यांच्यावतीने आळंदी येथील ज्ञानोबा माऊली यांच्या पावन भुमीत (दि. १७) रोजी ‘मानवाधिकार’ याविषयी एस. के. लॉन्स येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंढे, पुणे शहर महीला अध्यक्षा छाया भोसले, पिंपरी चिंचवड महिला सचिव माधवी के. जनार्धनन, पुणे जिल्हा महासचिव रवि गवस, हवेली तालुका महीला अध्यक्षा सुनिता गायकवाड, हवेली तालुका अध्यक्ष संतोष खांदवे व खेड तालुका अध्यक्ष हितेंद्र पडवळ व मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंढे यांनी, मानवाधिकार म्हणजे काय? त्याचे कार्य काय? सामान्य नागरिकांना संघटनेतर्फे कसा त्याचा हक्क व न्याय मिळवून दिला जातो. संघटना कशाप्रकारे पिडीत लोकांच्या मागे ऊभी राहून त्यांना न्याय व त्यांचा हक्क मिळवून देते, याबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड महिला सचिव माधवी के. जनार्धनन म्हणाल्या की, सध्या महिलांवर अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली असून, अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. जोपर्यंत महिला स्वतःचा आत्मविश्वास जागृत करणार नाहीत, तोपर्यंत समाजातील माथेफिरू त्यांच्या अबलापणाचा गैरफायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. महिलांना स्वतःवरील अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा.
पुणे शहर महीला अध्यक्ष छाया भोसले यांनी, महीलांना महीलांवर होणाऱ्या अत्याचाराला कसे सामोरे जावून, पिडीत महीलांना न्याय मिळवून देता येईल याचे छान मार्गदर्शन केले. पुणे जिल्हा महासचिव रवि गवस यांनी मनोगत व्यक्त केले. हवेली तालुका महीला अध्यक्ष सुनिता गायकवाड यांनीसुध्दा महीलांना सक्षम होण्यासाठी प्रोत्साहित केले.
कार्यक्रमास आळंदी व परिसरातील महीला व पुरूष मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी उपस्थितीतांनी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघासोबत काम करण्याची तयारी दर्शवली. लवकरच संघासोबत काम सुरु करून, अन्यायाविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या माध्यमातून एकत्र येणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे नियोजन हवेली तालुका अध्यक्ष संतोष खांदवे व खेड तालुका अध्यक्ष हितेंद्र पडवळ यांनी केले होते.
















