न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ नोव्हें.) :- गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या डॉक्टरांच्या मोटारीला अपघात होऊन पिंपरी-चिंचवडमधील दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथे आज रविवारी (दि. १८) पहाटे घडला.
युवराज विलास घाटोळे (वय ४०, रा. ड्रायव्हर कॉलनी, काळेवाडी. मूळ रा. मंगेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यासह अन्य एका डॉक्टरचा अपघातात मृत्यू झाला आहे.










