न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १८ नोव्हें.) :- चिंचवड येथील कामगार कल्याण मैदान येथे रविवार (दि. १८) रोजी अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्स फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळयाचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांना पिंपरी-चिंचवड युवा भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते कैलास कुटे यांच्या युवा पिढीसाठी केलेल्या समाजकार्याची दखल घेत, त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे संयोजकांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक मधुकर बाबर, हास्य सम्राट दिपक देशपांडे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे आदी उपस्थित होते.
















