न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हें) :- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या माध्यमातून सोमवार (दि. १९) रोजी प्रभागात सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढवा घेण्यात आला.
साई चौक येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाची एक बाजु डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, निगडी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संदिप खलाटे, कन्सल्टंट राहुल जगताप, विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता कावळे यांच्या शिष्टमंडळाने उड्डाणपुलाच्या कामांची पाहणी केली.
साई चौक हा मुख्य रहदारी तसेच वर्दळ असलेला चौक आहे, परंतु या परिसरामध्ये वाहतूकीच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या उड्डाणपुलामुळे या परिसरामध्ये IT कंपनी, हिंजवडी हबमध्ये काम करणारा मोठा वर्ग व रहिवासियांना वाहतुकीच्या प्रश्नाबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलामुळे वाकड, डांगे चौक, नाशिक फाटा व पुणे येथे जाण्यास अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर होऊन या परिसरातील वाहतूक कोंडीचा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.










