न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हें) :- स्वर्गीय राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपळे गुरव यांचे वतीने पिंपळे गुरव येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची १०२ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मदन कोठुळे, अजितसिंग कोचर, दिपक माकर, अध्यक्ष संदेश नवले, आकांक्षा हगवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आकांक्षा हगवणे या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटु खेळाडूस देशाच्या पहिल्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी क्रिडा पुरस्कार, अखिल महाराष्ट्र मुष्टियुद्ध संघटना महाराष्ट्र अजितसिंग कोचर, दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते यांनी शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देवुन गौरवण्यात आले.
यावेळी डॉ. मदन कोठुळे, जयराम शिंदे, अध्यक्ष संदेश नवल, दिपक माकर, कार्याध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना, पिं. चिं. शहर अजितसिंग कोचर, विलास साळुंखे, अजय खराडे, सरिता जायनीक, वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश नवले यांनी तर आभार विलास साळुंखे यांनी मानले.










