न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 20 नोव्हें) :- पिंपरी येथील डिलक्स चौक परिसरात आज सकाळी दहा वाजण्याच्या सूमारास जयहिंद शाळेच्या आवारातील वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे.
पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयाच्या इमारतीलगत असलेल्या दोन पानांच्या टपरीवर हे झाड उन्मळून पडले आहे. सुदैवाने टपरी बंद असल्यामूळे यात कोणातीही जीवितहानी झाली नसून, टपरीचे थोडेफार नूकसान झाले आहे.
घटनेची माहीती मिळताच महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पडलेल्या झाडाचे अवशेष हटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमूळे पिंपरी-काळेवाडी रस्त्यावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे, आमच्या पिंपरी प्रतिनिधीने सांगीतले










