न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २० नोव्हें) :- आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिं. चिं. म. न. पा. प्राथमिक शाळा कुदळवाडी येथे आज मंगळवार (दि. २०) रोजी स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्यावतीने शाळेतील सर्व शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार आयोजित केला होता.
कार्यक्रमास वस्ताद किसनराव लांडगे, स्वी. नगरसेवक सतोष मोरे, संतोष जाधव, दत्तात्रय मोरे, रूपेश हरगुडे, किशोर लोंढे, दिपक घन, स्वप्निल पोटघन, विशाल उमाप, दत्तात्रय बग, नंदु लगाडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश लांडगे याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुदळवाडी शाळेतील शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वस्ताद किसनराव लांडगे म्हणाले की, शाळेतील शिक्षकांचे कौतुक करुन, शिक्षक हाच समाजाला योग्य दिशा दाखवून समाजात प्रत्येक व्यक्तीचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न करतो, तसेच विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र काम निःस्वार्थीपणे करत असतो. संतोष जाधव यांनी शाळेतील सर्व गुरुजनांचे अभिनंदन करुन आमदार महेश लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आमदारांना मंत्रीपद मिळो! अशा शुभेच्छा दिल्या. संतोष मोरे स्वी. नगरसदस्य यांनी या शाळेमधे आम्ही शिक्षण पूर्ण करताना ढोल वाजवून वर्गणी गोळा करुन वर्गखोल्या वाढविल्या असे सांगितले.
दिनेश यादव यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना म्हटले की, शाळेसाठी वर्गखोल्या कमी असतानाही शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे काम करुन शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालयाची परीक्षा व क्रीडा स्पर्धेमध्ये सतत शाळेचे नाव उंचावत असतात, अशा सर्व गुरुजनांचा गौरव करणे आमचे उचित कर्तव्य असल्याचे सांगितले.















