न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २० नोव्हें) :- पुणे जिल्हा क्रीडा परिषद व संदीप तरटे शुटींग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, पुणे विभागीय रायफल शुटींग स्पर्धा १० नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर रोजी शिरूर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रांगणात पार पडल्या.
पुणे विभागीय रायफल शुटींग स्पर्धेत चिंचवडच्या शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयचा खेळाडू पीयूष निमसे याने चमकदार कामगिरी करीत १७ वर्षीय मुलांमध्ये (ओपन साईट ३२५/४००) या प्रकारात कास्यपदक मिळवले. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या या खेळाडुची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
यावेळी यशस्वी खेळाडू पीयूष निमसे यास संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी रोख पारितोषिक देऊन गौरविले असून, पुढील स्पर्धेसाठी शुभेछ्या दिल्या आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव, मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे, प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक अनिल करपे, उपमुख्याध्यापक किसन अहिरे आदींनी या खेळाडूचे अभिनंदन केले आहे.
क्रीडाशिक्षक दत्तात्रय भालेराव व शब्बीर मोमीन यांनी खेळाडूंस प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले होते.