न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २० नोव्हें) :- थेरगांव येथील संचेती प्राथमिक विद्यालयात मंगळवार (दि.२० नोव्हें.) रोजी गोवर अणि रुबेला लसीकरण मोहिमेविषयी माहिती देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे, शाळेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
रुबेला तसेच गोवरशी संबधित न्युमोनीया, अतिसार आणि मेंदूज्वर यासारख्या प्राणघातक आजारांपासून बालकांचे रक्षण व्हावे, यासाठी लसीकरण हा एकमेव संरक्षक उपाय आहे, तसेच सदर लस विनामूल्य असल्याचे शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना यावेळी सांगितले.
यावेळी वाघमारे उधव, मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे, गायकवाड श्रीधर, उपशिक्षीका जोशी, विद्यार्थी व परिसरातील पालक आदी उपस्थित होते.