न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरातील अवैध नळजोड नियमितीकरणासाठी शहरातील नागरिकांना महापालिकेकडे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. वेळोवेळी मुदतवाढ देवूनही नागरिकांनी अधिकृत नळजोडणीकडे पाठ फिरवली आहे. शहरात अजूनही १४ हजार ४४७ नळजोड अवैध आहेत.
वाढीव मुदतीत केवळ २२९८ नागरिकांनी नळजोड नियमिती करण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी केवळ १६२७ जणांचे अर्ज पाणीपुरवठा विभागाने अंतिमतः मंजूर केले आहेत. त्यामुळे महानगरपालिका उर्वरित अवैध नळजोड धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.