न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हें) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून चिंचवडमधील पूर्णानगर येथील शनिमंदिर मैदानावर गुरुवार दिनांक २२ ते शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर दरम्यान माजी महापौर कै. मधुकर रामचंद्र पवळे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
यावेळी क्रिडा समिती सभापती संजय नेवाळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक शैलेश मोरे, नगरसेविका सुजाता पलांडे, अनुराधा गोफणे आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्घाटन अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहेत. यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, खासदार अमर साबळे हे उपस्थित राहणार आहेत.
यात पुरूष खेळांडुचे ३० संघ तर महिला खेळाडुंचे २० संघ, अशा एकूण ५० संघांचा स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे, अशी माहिती महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आणि क्रिडा समिती सभापती संजय नेवाळे यांनी दिली आहे.