न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २० नोव्हें) :- भोसरी येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सागर कुंदनमल साखला यांची अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सच्या महाराष्ट्र प्रदेश (पंचम झोन) अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ही निवड दोन वर्षांसाठी आहे. साखला यांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल वखारिया व नितिन संकलेचा यांनी केली. यावेळी जैन समाजाचे वरिष्ठ नेते विजयकांत कोठारी, महामंत्री अशोक पगारिया आदि मान्यवर उपस्थित होते. साखला हे राष्ट्रिय कार्यकारिणीवर मंत्री असुन भोसरी श्रीसंघाचे कार्यध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडी बद्दल राष्ट्रीय युवा संरक्षक पारस मोदी यांनी फोनद्वारे अभिनंदन केले आहे.
भोसरी श्री संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, माजी अध्यक्ष डॉ जवाहर भळगट, राजेंद्र चोरडिया, विजयकांत कर्नावट, गिरीष मुथियान, डॉ प्रदिप गांधी, संतोष नवलाखा, संजय बोरा, राजेंद्र बांठिया, संजय भंडारी, विलास पगारिया आदिंनी अभिनंदन केले आहे.
















