न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २१ नोव्हें) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, चिखलीतील साने चौक येथे शुक्रवार (दि. २३) रोजी युवा नेते पांडुरंग साने यांच्यावतीने ”चला हवा येऊ द्या” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
”चला हवा येऊ द्या” या विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्राभर रसिकांचे मनोरंजन करून विनोदी लाट निर्माण केलेली आहे. ”चला हवा येऊ द्या” या विनोदी मालिकेचे अभिनेते भाऊ कदमसह सर्व टीम यावेळी ‘आम्ही फक्त, दादा भक्त’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण चित्रपट अभिनेत्री ‘मानसी नाईक व माधवी निमकर’ या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, महापौर, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित राहणार असल्याचे, कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग साने यांनी न्यूज पीसीएमसीच्या प्रतिनिधीस सांगितले.