न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- महाराष्ट्र थायबॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग संघटनेच्यावतीने शुक्रवार दिनांक २३ ते २५ नोव्हेंबर यादरम्यान १३ वी राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा चिंचवडगावातील मोरया मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेस महाराष्ट्रातून २६ जिल्हे व ६ महानगरपालिकांचे संघ सहभागी होणार एकुण ७३० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेस श्रीरंग उर्फ अप्पा बारणे खासदार मावळ लोकसभा, गौतम चाबूकस्वार आमदार, पिंपरी विधानसभा, राहुल जाधव महापौर, पिंपरी चिंचवड मनपा, इरफान सय्यद, भारतीय कामगार सेना व स्थानिक नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धा संयोजन पी. वाय. अत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जमीर शिकलगार, नाजिम शेख, महादेव खराडे, जैद शेख यांनी उत्तम तयारी केलेली आहे.