न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हें) :- रिक्षा चालक मालक हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यांना देखील सन्मानाची वागणूक मिळावी, असे मत प्रा.शशिकांत सोनवणे यांनी व्यक्त केले. खराडी साईनाथनगर येथील महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न टायगर ग्रुप रिक्षा स्टँड उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न टायगर ग्रुप रिक्षा स्टँडचे उदघाटन नुकतेच प्रा. शशिकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आनंद तांबे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ साबळे, टायगर ग्रुपचे प्रवक्ते विनोद भेगळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत हवेली तालुका अध्यक्ष सदाशिव पवार पाटील, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लक्षण लोंढे, टपरी पथारीहातगाडी पंचायत उपाध्यक्ष अनिल गायकवाड, सचिव प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सुनील लोणारे, स्टँड अध्यक्ष सम्राट मुंढे, हर्षद अत्तार, प्रदीप धेंडे, मयूर ढोणे, किशोर लडकत, गणेश सपनवर, राजू देशमुख, तोशीन अत्तार, संदीप मोरे, राजेंद्र गायकवाड, अक्षय खाडे, बाबासाहेब मोरे, चंद्रकांत बिराजदार, वनराज उसवरे, अशोक कोळेकर, प्रवीण लोखंडे, गौतम जगताप, नजर इसम, बाळकृष्ण हिंगोळे आदींनी परिश्रम घेतले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.










