न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरीच्या महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमृतलाल डुंगरवाल व डॉ. जवाहर भळगट यांना जाहीर झाला आहे. भोसरीच्या जडणघडणामध्ये व विकासामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो, असे फाउंडेशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.
अमृतलाल डुंगरवाल हे भोसरी परिसरात गेल्या ३४ वर्षांपासून आशीर्वाद बुक डेपो या पुस्तकविक्रीच्या माध्यमातून सामाजिक वाचनशीस्त लावण्याचे कार्य करीत आहेत. डॉ. जवाहर भळगट हे जामखेड येथील दुष्काळी भागातून येऊन, गेल्या अनेक दशकांपासून भोसरी व पुणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे महत्वाचे काम करीत आहेत.
जीवनगौरव पुरस्काराबद्दल या दोन्ही समाज धुरंधरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, श्री. जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, जैन कॉन्फरन्सचे प्रदेश अध्यक्ष सागर सांकला, डॉ. प्रदीप गांधी, राजेंद्र बांठिया, विजय कर्णावट, सुभाष बोथरा, मदनलाल कर्णावट, विजय पारख, संजय बोरा, सचिन ताथेड, गिरीश मुथियान आदींनी या पुरस्कारमूर्तींचे अभिनंदन केले आहे.















