न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (24 नोव्हें) :- पिंपळे गुरव येथील समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने श्री भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा व कीर्तन महोत्सवास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी चिराग जगताप (कलश पूजन), ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम (गाथा पूजन), नगरसेवक नवनाथ जगताप (ज्ञानेश्वरी पूजन), शंकर जगताप (वीणापूजन), विजय गणपत जगताप (टाळ व मृदंग) आदिंचे भक्तिमय वातावरणात पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेवक सागर अंगोळकर, नगरसेविका माधवी राजापुरे, माऊली जगताप, संदेश नवले, आदेश नवले मंडळाचे अध्यक्ष जयवंत देवकर आदि उपस्थित होते.
मंदिरामध्ये पहाटे ४ वाजता काकडा भजन, ९ वाजता गाथा भजन, दुपारी २ वाजता महिला भजन, सायंकाळी ५ वाजता हरीपाठ, ६ वाजता कीर्तन आदि कार्यक्रम सुरू आहेत.
आज शनिवार (दि. २४) रोजी हभप उमेश महाराज किर्दत (सातारा), रविवारी ता. २५ रोजी हभप नरेंद्र महाराज गुरव (नाशिक), सोमवारी ता. २६ रोजी हभप स्वप्निल महाराज कदम (पिंपळे गुरव), मंगळवारी ता. २७ रोजी हभप नवनाथ महाराज मस्के (शिर्डी), बुधवारी ता. २८ रोजी हभप गणेश महाराज कारले (पुणे), गुरुवारी ता. २९ रोजी हभप माऊली महाराज कदम (आळंदी), सायंकाळी ६ वाजता दिंडी मिरवणूक शुक्रवारी ता. ३० रोजी हभप संतोष महाराज तायडे (पुणे) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. सायकाळी ६ वाजता कृष्णाई उळेकर हिचा मराठवाड्याची लोककला भारुडाचा कार्यक्रम होणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले आहे.
















