न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९. जुलै. २०२०) :- भाजपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे यांनी प्रभागात ‘माझा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग’ हा उपक्रम राबविला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांची मोफत थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरच्या साहय्याने ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्यात येत आहे. त्यास नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
भाजपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे व विश्व श्रीराम सेना आरोग्य विभागाचे अध्यक्ष अक्रम शेख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या अभियानास सुरुवात झाली.
त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते के. के. कांबळे, भरत चित्ते, मुन्ना अभोनकर, गणेश दातिर, गणेश क़ाळभोर, पंढरी थरकुड़े, अजित माने, विनायक वायकर, वरुण क़ाळभोर, अभिनव कुटे, किशोर थोरात, गणेश नाईक, दिनेश झरकर, ओंकार गव्हाणे आदी उपस्थित होते.


















