न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २६ नोव्हें) :- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, बी. एस. कांबळे (प्रसिद्ध लेखक), युवराज प्रगणे (सामाजिक कार्यकते), सुरेश भाल्रेराव (मा. पोलीस निरीक्षक) संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शांताराम भालेराव, बाळासाहेब शेंडगे, पी. एस. गानार, हर्षवर्धन कांबळे, आणि मुख्याध्यापिका श्राबनी पत्रानाभिष, मंजुळा मुदलियार, उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका हर्षदा काकडे व चारुशीला फुलपगार यांनी विद्यार्थ्याना संविधानाबाबत मार्गदर्शन केले संस्थेचे. संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनीही संविधान दिनाबाबत माहिती सांगितली. बी. एस. कांबळे सन्मानीय पाहणे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यानी व शिक्षिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन केले व प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. रॅली शाळेतून कोकणे चौक ते पिंपळे सौदागर चौकी ते पीसीएमसी. शाळा रहाटणी आणि पुन्हा शाळेत मुक्कामी आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका राखी पोरल तर हेमा शेलार यांनी आभार मानले.