न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २६ नोव्हें) :- मोशी-प्राधिकरण येथील गॅलक्सी किड्स प्री. प्रायमरी स्कूलच्यावतीने शनिवार (दि. २४ नोव्हें.) रोजी बालक दिन व ग्रॅन्ड पेरेंट्स दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन, विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिक, शिक्षिका आदी उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन यांनी बालक दिन व ग्रॅन्ड पेरेंट्स दिनाचे महत्व समजावून सांगितले. तसेच उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यात सेकंड इनिंग कशी जगावी? याचे सुंदर उदाहरण मुले व त्यांच्या पालकांसमोर सादर केले होते.