न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आकुर्डी (दि. २६ नोव्हें) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह सोमवार (दि.२६) रोजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेतली व संविधान भवनासाठी जागा देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, उत्तम केंदळे, नगरसेविका भीमाबाई फुगे, हिराबाई घुले, साधना मळेकर, सुवर्णा बुर्डे, स्वीनल म्हेत्रे, कमल घोलप, यशोदा बोईनवाड, निर्मला गायकवाड, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, योगिता नागरगोजे आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले, भारत देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. विविध धर्म, जात, पंथ असूनही संविधानाने हा देश एकसंध बांधलेला आहे. या संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतातील पहिले संविधान भवन उभारावे. यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील जागा मिळावी. शहराच्या मध्यभागावर उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता होण्यास मदत होईल.
नगरसेवक विकास डोळस म्हणाले, “संविधान भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संविधान भवनसारखी वास्तू जर संपूर्ण संविधान जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात उभा राहत असेल. तर, हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय एकतेचा सन्मान आहे.
















