न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २७ नोव्हें.) :- वीरशैव लिंगायत गवळी समाज पुणे जिल्ह्याच्यावतीने मोहननगर येथे शिवपार्वती मंगल कार्यालय या ठिकाणी (दि. २५) रविवार रोजी वधू-वर पालक परिचय मेळावा पार पडला.
या मेळाव्या साठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा, इ. राज्यातून मुले मुली व पालक आले होते. सदर मेळाव्याचे आयोजन पुणे जिल्हा वीरशैव लिंगायत गवळी समजाचे अध्यक्ष दत्तात्रय लंगोटे व मा.नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी केले होते. सदर मेळाव्यासाठी १६५ नियोजित वधू- वर उपस्थित होते. वधू – वर परिचय मेळाव्या नंतर पालक परिचय मेळावा व मान्यवरांचे मनोगते झाली. यावर समाजातील जुन्या चालीरीतीवर भाष्य करण्यात आले.
आधुनिकतेची कास धरून समाजाने पुरोगामी राहिले पाहिजे. समाजासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे विचार उस्मानाबाद वरून आलेले गवळी समाजाचे नेते प्रा. भालचंद्र हुच्चे यांनी सांगितले. या प्रसंगी हायकोर्ट जज अॅड. चंद्रकांत बिडकर, सोलापूरचे श्री. देवा अंजीरवाने, लोणावळा मा. नगराध्यक्ष मा. राजू गवळी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या नगरसेविका रुपाली बिडकर, नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेवक मारुती भापकर, नगरसेविका मीनल यादव, वैशाली काळभरे इत्यादी उपस्थित होते.
मेळावा यशस्वी होण्यासाठी विजय मालकुनाईक, लक्ष्मण नामदे, अशोक बहिरवाडे, संजय दहिहंडे, अक्षय नामदे, सुरेश लंगोटे, चंद्रकांत अलंकार इत्यादींनी परिश्रम घेतले.










