न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हें.) :- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना अनधिकृत होर्डिंग्जबाबत निवेदन दिले असून, त्यात त्यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत सध्या जाहीरत फलक, होर्डींग्ज काढणेची कारवाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हे अनधिकृत होर्डींग्ज काढण्यास स्थायी समिती सभेत विषय क्र. ४४, ठराव क्र. ३६०५ अन्वये र. रु. ३ कोटी ५० इतकी वाढीव तरतूद करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शहरातील अनधिकृत होर्डिग्ज लावणा-यांना नोटीस देवून त्या होर्डिग्ज काढून संबंधितांकडून दंडात्मक वसूली करावी, शहरातील ३०० अनधिकृत फलक काढण्यास तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. एक अनाधिकृत होर्डींग्ज काढण्यास सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. अनधिकृत होर्डींग्ज ज्यांनी लावले आहेत. त्यांच्याकडूनच काढून घेणे अपेक्षित असताना महापालिका त्याच्यावर कोट्यावधी खर्च करीत आहे. त्याकरिता साडेतीन कोटी खर्च करणार आहे. सत्ताधारी भाजपच्या महापालिकेतील सल्लागाराला हे कंत्राट देण्यात आल्याची चर्चा आहे.
सदरील वाढीव खर्चाच्या ठरावाची अंमलबजावणी न करता शहरातील अनाधिकृत मिळकतींना नोटीसा देऊन त्या काढण्याच्या सुचना दिल्या जातात त्याप्रमाणे अनाधिकृत होर्डींग्ज ठेकेदारांना नोटीसा बजावण्यात याव्यात. यामध्ये धोकादायक होर्डींग्जचा प्राध्यान्याने समावेश करावा. नोटीस बजावूनही संबधितांना होर्डींग्ज न काढल्यास मनपामार्फत ते होर्डिंग्ज काढण्यात यावेत. त्याचा खर्च व दंड संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्यात यावा. त्याना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली आहे.










