न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. २८ नोव्हें) :- वाल्हेकरवाडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत आज बुधवार (दि. २८) रोजी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील एकूण ९२० विद्यार्थ्यांना यावेळी गोवर-रुबेला लस देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांना गोवर-रुबेला या आजाराबद्दल माहिती दिली व या आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
शिबिरास उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेविका करुणा चिंचवडे, मा. नगरसेवक श्रीधर वाल्हेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गीतांजली कोल्हे, मुख्याध्यापिका रोहिणी जोशी, उप-मख्याध्यापिका उज्वला ढमढेरे, सहशिक्षिका ज्योती तापकीर, पर्यवेक्षक शोभा परदेशी, भार्गवी गोयेकर, मनीषा येवले, लता मुंढे, अनिता गिरी, वाल्हेकरवाडीच्या आशा स्वयंसेविका आशा लोखंडे, दिपाली नवघणे, विद्यार्थी, पालक व आदी उपस्थित होते.










