न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ नोव्हें) :- उपप्रवर्तनी साध्वी मंजूल ज्योतीजी महाराज यांचा भोसरी येथील ऐतिहासिक चातुर्मासाची सांगता महाराजांच्या विदाई समारोहानी झाली. यावेळी साध्वीजींनी आपले मनोगत व्यक्त केले व भक्तीसंध्या कार्यक्रमाने समारोप झाला.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. साध्वी युवाप्रेरक वसुधाजी महाराज, आरीठाना ५ श्री संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, जैन परिषदेचे प्रदेश अध्यक्ष सागर सांकला, विजय कर्नावट, राजेंद्र चोरडिया, डॉ. जवाहर भळगट, डॉ. प्रदीप गांधी, राजेंद्र बांठिया, संजय बोरा, गिरोरा मुथीयान, सुभाष डुंगरवाल, विलास पगारिया आदी कार्यक्रमास उपस्थित होते.










