न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हें) :- सांगवी परिसर महेश मंडळतर्फे स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान, ‘उमंग’ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात सुदृढ बालक, सुंदरलेखन, चित्रकला, ज्ञानगंगा (सामान्य ज्ञानावर), बुद्धिबळ, मेहेंदी, सलाड डेकोरेशन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विविध स्पर्धामध्ये २५० हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.
या स्पर्धांचे पारितोषिक वितरण डॉ. रामविलास मंत्री व हिरालाल मालू यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनावणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडलचे अध्यक्ष नरेंद्र चांडक, महेश मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपेश मालाणी व पूनम काबरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुकुंद तापडिया , पंकज चांडक, गणेश चरखा, तुषार माहेश्वरी, अमोल डागा, विवेक झंवर, घनशाम बाहेती, निलेश अटल, पद्मा लोहिया आदींनी सहकार्य केले










