न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हें) :- ‘सोहम डेव्हलपर्स’ या प्रथितयश बांधकाम संस्थेचे अध्यक्ष महेश बारणे यांनी ‘प्रहार जनशक्ती पक्षाचे’ संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांची मुंबईतील त्यांच्या आमदार निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
सर्वप्रथम उद्योजक महेश बारणे यांनी आमदार बच्चू कडू यांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व मान्यवरांच्या हस्ते आमदार बच्चू कडू यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे, उद्योजक दीपक भोंडवे, दत्तात्रय आसवले, सचिन बारणे आदी उपस्थित होते.
उद्योजक महेश बारणे यांनी वंचित, आर्थिक मागास घटकांसाठी भरीव कार्य करणाऱ्या सत्यशोध या संस्थेस आर्थिक हातभार लागावा, या हेतूने पाच लाख रुपयांचा धनादेश आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. उद्योजक महेश बारणे यांच्या सामाजिक जाणीव व समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, या गोष्टींचे आमदार बच्चू कडू यांनी याप्रसंगी कौतुक केले.










