न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २८ नोव्हें) :- प्रोग्रेसिव्ह एज्युकेश सोसायटीचे मॉडर्न हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा केला. प्रसंगी प्राचार्य सतीश गवळी यांनी संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, संस्थेच्या सहसचिव ज्योत्स्ना एकबोटे व शालासमिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गंगाधर सोनवणे यांनी केले. संविधानचे वाचन आकांक्षा कौजलगिकर हिने केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.