न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०३ सप्टेंबर) रोजी ९७७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५५८१ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यात पिंपळे सौदागर (स्त्री ५७ वर्षे), नेहरूनगर (पुरुष ६३ वर्षे), चिखली (पुरुष ४६ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), भोसरी (पुरुष ६३ वर्षे), पिंपळे निलख (पुरुष ७२ वर्षे), निगडी (पुरुष ७१ वर्षे), चिंचवड (पुरुष ६५ वर्षे, पुरुष ७० वर्षे, स्त्री ७४ वर्षे), रुपीनगर (पुरुष ६७ वर्षे), मोशी (स्त्री ७८ वर्षे), खेड (पुरुष ७० वर्षे, पुरुष ६० वर्षे), कामशेत (पुरुष ५८ वर्षे), मंचर (पुरुष ६१ वर्षे, पुरुष ७२ वर्षे), वाघोली (पुरुष ७२ वर्षे), विश्रांतवाडी (पुरुष ८३ वर्षे), लोणावळा (पुरुष ५६ वर्षे) येथील रुग्णांचा समावेश आहे.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ५२२८४ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४१७०४ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ८९१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.