न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२४) :- हुदाई कंपनीच्या असेन्ट गाडीमधून वेगवेगळया कंपनीच्या देशी, विदेशी दारुच्या बाटल्या, तसेच बिअरच्या बाटल्या बेकायदेशिररित्या विक्रीसाठी वाहतुक करताना पोलिसांच्या निदर्शनास आल्या.
गुन्हे शाखा, युनिट-१, पिंपरी चिंचवड पोलिसांनी (दि.३०/०४/२०२४) आळंदी-देहु रोड, चिखली येथील आशियाना बेकरीचे जवळ रोडचे कडेला कारवाई करून ६१,२८० चा माल व २,००,००० रु किंमतचे हुदाई कंपनीची असेन्ट गाडी असा एकुण रुपये २,६१,२८० चा माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विलास मुरलीधर कबाडे (वय ३४ वर्षे, रा. विठ्ठलवाडी, देहुगांव, मुळ रा. चांगेफळ, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) याच्या विरोधात चिखली पोलिसांनी २५५/२०२४ मु.प्रो. अॅक्ट कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहवा बनसोडे पुढील तपास करीत आहेत.