न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२४) :- कोणताही कायदेशीर परवाना नसताना दोघांनी २५,००० रुपये किंमतीचा गावठी कट्टा जवळ बाळगला. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या कार्यालयीन आदेशाचा भंग केला.
याप्रकरणी पोलिसांनी (दि.०१) रोजी दुपारी ३.१५ वा. राममंदीराचे समोर, मेनरोड, पाटीलनगर, चिखली येथे कारवाई करीत १) आदित्य कालीदास थोरात (वय २२ वर्षे, रा. ताम्हाणेवस्ती, चिखली; मुळ चांडवली, ता. आंबेगाव, जि.पुणे), २) विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
चिखली पोलिसांनी २५८/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-१९५१ चे कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ याला अटक केली आहे. पोउपनि मुळीक तपास करीत आहेत.