- वाकडच्या कावेरीनगर पोलीस लाईनमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जुलै. २०२१) :- श्रध्दा जायभाये (वय २८, सध्या रा. कावेरीनगर पोलीस लाईन, वाकड, पुणे), या विवाहीत महिला पोलिसाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस असून सध्या ते केरळमध्ये आहेत. श्रध्दा यांना दोन वर्षांची मुलगी आहे.
वाकड येथे सोमवारी (दि. ५) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रध्दा यांनी पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे आढळले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. श्रध्दा या पुणे शहर दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस होत्या. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.