- मित्रांना पाठवून केली बदनामी; तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जुलै २०२१) :- महिलेने तीन वर्षांपूर्वी आरोपीला मोबाईल नंबर दिला नाही. याचा राग मनात धरून पीडित महिलेच्या नकळत त्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतला.
व्हिडिओला तृतीय पंथीयांच्या गाण्यावर डब करून तो मित्रांना पाठवला. यामुळे महिलेची बदनामी झाली. फिर्यादी महिलेला पाहून टाळ्या वाजवून अश्लील हावभाव केले.
या प्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रेय गोळे, महेश आमराळे, शरीफ (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अद्याप ते फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.