- पालिका पोलीस आयुक्तालयाशी करणार तीस वर्षांचा करार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पोलिस उपायुक्त परिमंडळ दोनसाठी वाकड व पुनावळे येथील अनुक्रमे १८ गुंठे आकाराची मोकळी जागा देण्यात येणार आहे. तीस वर्षे कालावधीसाठी भाडेतत्वावर जागा दिली जाणार आहे. त्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पोलिस परिमंडळ दोनमध्ये सांगवी, वाकड, हिंजवडी, चिखली, देहरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी या ७ पोलिस ठाण्याचा समावेश आहे. तसेच, शिरगाव व रावेत स्वतंत्र पोलिस चौकीचा भाग आहे. या भागासाठी पोलिस विभागीय कार्यालयसुरू केल्यास कायदा सुव्यवस्था व प्रशासकीय कामकाज करणे सुलभ होणार आहे.
तसेच, पोलिस आयुक्तालयातील अधिकारी वर्गासाठी स्वतंत्र निवासस्थान उभारता येऊ शकतील. या करीत वाकड सर्व्ह क्रमांक १११/१/१ मधील १८ गुंठे आणि पुनावळेतील सर्व्ह क्रमांक १२/१ ते ७ मधील ३.५ गुंठे जागेची मागणी पोलिस आयुक्तालयाने पालिकेकडे केली आहे. या जागा पालिकेस ‘ आयटीआर ‘ अंतर्गत मिळाल्या आहेत. दोन ठिकाणच्या एकूण ११.५ गुंठे जागा पोलिस आयुक्तालयास ३० वर्ष भाडेतत्वावर दर ५ वर्षाच्या प्रचलित दराने देण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.