- नगरसेवक निलेश बारणेंना पितृशोक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२१) :- शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंचे मोठे बंधू हिरामण बारणे यांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. विद्यमान नगरसेवक निलेश बारणेंचे ते वडील होते. अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या हिरामण बारणेंना वयाच्या सत्तरीत कोरोनाने गाठले.
अर्धांगवायूच्या उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी ते निपाणीला गेले होते. तिथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आणि आज खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
हिरामण बारणे हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत नगरसेवक झाले तसेच त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही भूषवले होते. थेरगावचे उपसरपंच, महापालिकेच्या स्थापनेनंतर १९८६ च्या पहिल्या निवडणुकीत नगरसेवक आणि १९८८-८९ ला स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून ही त्यांनी काम केले. त्याबरोबरच संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.