- पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- कुदळवाडीच्या पाटील चौकाजवळ दोस्ती पान शॉप या टपरीमध्ये आरोपी प्रतिबंधित गुटखा आणि हुक्का फ्लेवर विक्री करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास सापळा लावून टपरीवर कारवाई केली.
पोलिसांनी या कारवाईमध्ये ५१ हजार ६१२ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि ५४ हजार ९० रुपये किमतीचा हुक्का फ्लेवर जप्त केला. तसेच हुक्का फ्लेवर विक्री करून मिळालेली ७० हजार ४० रुपये रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण १ लाख ७५ हजार ७४२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत आरोपीला अटक केली.
पोलीस हवालदार संतोष दिघे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आतिक मोबीन अहमद खान (वय २५, रा. पवारवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.