- भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑगस्ट २०२१) :- तृतीयपंथी इसमाने महिला व त्यांची मुलगी त्यांच्या किराणा दुकानात थांबले असता दोन हजार रुपयांची फिर्यादीकडे मागणी केली. फिर्यादी महिलेनं पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी तृतीयपंथी इसमाने ‘पैसे नाही दिले तर हात पाय तोडेन’ अशी धमकी दिली.
तसेच, मुलीला शिवीगाळ करून दुकानासमोर आरडाओरडा केला असे फिर्यादीत म्हटले आहे.ही घटना भोसरीतील खंडेवस्ती येथील जयमाता दी किराणा दुकानात शुक्रवारी (दि. ०६) सायंकाळी पाच वाजता घडली.
दुकान मालक महिलेने शुक्रवारी (दि. ०६) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथी इसमावर भारतीय दंड विधान कलम ३८५, ५०४ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.