न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- वाकड रस्त्यावरील सिद्धनाथ गॅस सर्व्हिस दुकानात इंण्डेन कंपनीचा सिलेंडरचा साठा करून ठेवला होता. धोकादायकरित्या कोणत्याही सुरक्षेची खबरदारी न घेता घरगुती सिलेंडरमधून चार किलो वजनाच्या गॅस सिलेंडर टाकीमध्ये गॅस काढून घेऊन गॅसची चोरी करीत ग्राहकांची फसवणूक केली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास कारवाई केली. पोलिसांन रोख रक्कम, ॲपे रिक्षा, गॅस व इतर साहित्य, असा एकूण एक लाख २७ हजार २८७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस कर्मचारी नितीन लोंढे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दादा विठोबा मेटकरी (वय ३४, रा. थेरगाव), महेंद्र खियाराम ईसरवाल (वय ५०, रा. डांगे चौक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके तपास करीत आहेत.
















