- महापौर ढोरे यांच्यासह माजी महापौर राहुल जाधव यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२१) :- पर्यावरण संतुलित शहरासाठी वृक्षारोपण महत्वाचे असून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करावे व आपले शहर हरीत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
जाधववाडी चिखली येथील शिवरस्त्यावरील दुभाजकामध्ये आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, उप आयुक्त सुभाष इंगळे, नगरसदस्या आश्विनी जाधव, सारिका सस्ते, आदी उपस्थित होते.
शहरात हरीत क्षेत्र वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वृक्षारोपण करण्यात येत आहे. शिवरस्ता जाधववाडी चिखली येथील सीएनजी पेट्रोल पंप ते देहू आळंदी रोड १६४१ मीटर लांबीच्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
















