- महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात मनसेचे पिंपरीत निषेध आंदोलन….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२१) :- महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. प्रामुख्याने लहान आणि अल्पवयीन मुली अत्याचाराला जास्त बळी पडत आहेत. विनयभंगाच्या आणि बलात्कारांच्या घटनांची यादीही मोठी होत आहे.
याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने पिंपरीतील आंबेडकर पुतळ्यासमोर राज्यभरात महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच नराधमांना फाशीची देण्याची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष सचिन चिखले, महिला सेना अश्विनी बांगर (शहराध्यक्ष), सीमा बेलापुरकर (शहर सचिव), अनिता पांचाळ, उपशहराध्यक्षा स्नेहल बांगर, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी, वैशाली बोत्रे, वैशाली कोराटे, अनिता नाईक, श्रद्धा देशमुख, संगीता कोळी, काजल गायकवाड, हेमंत डांगे विद्यार्थी सेना अध्यक्ष, के के कांबळे, आकाश लांडगे, रोहित थरकुड़े, किरण वाघेरे, सुशांत साळवी वाहतूक सेना अध्यक्ष, रूपेश पटेकर कर्मचारी सेना अध्यक्ष, विशाल सालूंखे, विशाल मानकरी, राजू भालेराव जनहित कक्ष, राजेश अवसरे, परमेश्वर चिल्लरगे, नारायण पठारे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, नाथा शिंदे, सुरेश सकट, नीलेश नेटके, तुकाराम शिंदे, ऋषिकेश जाधव, गणेश वाघमारे, अक्षय नाळे, डी एम कोळी तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचारांचे काय? येथे घडणाऱ्या घटनांसाठी फक्त कॅन्डल मार्च, मशाल मोर्चा काढायचा? उद्धव सरकारने आता तरी जागे व्हावे, त्यांना महिलांचा आक्रोश ऐकू येत नाही का?, असा सचिन चिखले यांनी उपस्थित केला.