- पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२१) :- पिंपरीतील महालक्ष्मी हाईट्स येथे पहिल्या मजल्यावरील किशोर अँड असोसिएट्स या चार्टर्ड अकाउंटटच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांन मागील खिडकीच्या ग्रीलचे कुलूप तोडून प्रवेश केला. ऑफिसमधील लाकडी टेबलाच्या ड्रॉवरचे लॉक तोडून ५४ हजार ४०० रुपयांची रोकड, मोबाइल फोन चोरुन नेला.
तसेच चोरट्यांनी याच इमारतीमध्ये तळमजल्यावर असलेल्या आवास फायनान्सियर्स लिमिटेड या ऑफिसच्या मागच्या खडकीचे ग्रील तोडून खिडकीच्या काचा काढून आत प्रवेश केला. ऑफिसमधील टेबल ड्रॉवरचे लॉक तोडून, ऑफिसमधील सामान अस्ताव्यस्त करून चोरी करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना सोमवारी (दि. १३) सायंकाळी सात ते मंगळवारी (दि.१४) सकाळी नऊ या कालावधीत ही घडली. किशोर माधवदास गुजर (वय ६१ रा. निगडी प्राधिकरण) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.