न्युज पीसीएमसी नेटवर्क : काळेवाडी प्रतिनिधी : भाऊसाहेब तापकीर शाळेच्यावतीने गोपालकाला दहीहंडी उत्सव बाल- गोपाळांनी दहीहंडी फोडून उत्साहात साजरा केला. दहीहंडीत पोहे, लाह्या, दही, साखर, केळी अशा अनेक मिश्रणांनी बनविलेला काला हा प्रसाद म्हणून सर्व गोपाळांना वाटण्यात आला.
दहिहंडी फोडण्याचा मान पहिलीतील सोहम वानखेडे या विद्यार्थ्याला मिळला. दहीहंडी फोडल्यानंतर श्रीकृष्णाची यथासांग पुजा करुन सामुहीक कृष्णगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी सामुहिक गायन करुन हा सोहळा साजरा केला. यावेळी कृष्णलिला आणि श्रीकृष्णाच्या प्राचीन गोष्टी शिक्षकांकडून सांगण्यात आल्या.
शिक्षिका उल्का जगदाळे आणि जयश्री पवार यांना कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सचिव मल्हारीशेठ तापकीर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा हा नयनरम्य सोहळा पाहण्याकरिता पालकांनी शाळेत गर्दी केली होती.












