आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांची आगामी पिंपरी विधानसभेची जय्यत तयारी.
न्यूज पीसीएमसी नेटवर्क : चिंचवड प्रतिनिधी : आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा वाढदिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी काल साजरा करण्यात आला.
मोहननगर येथील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी अभिष्टचिंन सोहळा पार पडला. वाढदिवसानिमित्त फुगेवाडी येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाला पाच लाख रूपये किंमतीची कुस्ती मॅट आमदार चाबुकस्वार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
कष्टकरी कामगार संघटनेच्या वतीने नेत्रतपासणी शिबिर व चष्मेवाटप कार्यक्रम घेण्यात आला. आयोजन बाबा कांबळे यांनी केले होते.
शिवसेनेच्या फुगेवाडी शाखेच्या वतीने गरीब विदयार्थ्यांना १० हजार वहयांचे वाटप करण्यात आला.विभागप्रमुख एकनाथ हाके, शाखाप्रमुख निलेश हाके यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
पुण्यातील खुद्दाम-ए-मिल्लत व आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार युवा मंचच्या वतीने मुस्लिम वधु-वर पालक परिचय मेळावा घेण्यात आला. मिलिंदनगर येथील जामा मस्जिद येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
दापोडी व फुगेवाडी येथील शिवसेना शाखेच्या अनाथ आश्रमात अन्नदान करण्यात आले. यामध्ये विनोद शिंदे, विकास गायकवाड, ॲड. अजित बोराडे, स्वप्नील शेवाळे यांनी सहभाग घेतला.
सर्वपक्षीय नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव :
आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आमदार महेश लांडगे, खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, योगेश बहल, हनुमंत गावडे, आझमभाई पानसरे, कैलास कदम, नरेंद्र बनसोडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक,धार्मिक महापालिकेतील अधिकारी पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.












