बीएसएनएल सल्लागार समितीची बैठक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे संपन्न झाली.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूरसंचार यंत्रणेत सुधारणा करण्याकरिता आवश्यक त्या उपाय-योजनांचा यावेळी खासदार आढळराव पाटील यांच्यावतीने आढाव घेण्यात आला.
तसेच आंबेगाव तालुका व पुणे जिल्ह्यातील सदोष दुरसंचार यंत्रणा कार्यक्षमरितीने कार्यन्वित करण्याकरिता कंपनीने आवश्यक ती सुधारणा करावी व ग्राहकांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी असे मत बीएसएनलचे सदस्य दत्तात्रय भालेराव यांनी व्यक्त केले.
यावेळी दुरसंचार यंत्रणा अधिक सक्षम व्हावी याकरीता आवश्यकतेनुसार मोबाईल टॉवर व साधनसामग्री उपलब्ध करण्याकरीता खासदार आढळरावांनी बीएसएनएल अधिकाय्रांना आवश्यक त्या सूचना केल्या.
यावेळी खासदार अनिल शिरोळे, खासदार आढळराव, सदस्य दत्तात्रय भालेराव, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
















